रिलायन्सकडून १० लाख कर्मचारी आणि कुटुंबियांचे लसीकरण

Spread the love

• सर्वसामान्यांनाही १० लाख डोस देणार
कोल्हापूर • प्रतिनिधी
    रिलायन्स इंडस्ट्रीजने आतापर्यंत या उद्योग जगतातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून दहा लाखाहून अधिक मोफत लस दिल्या आहेत. रिलायन्सच्या ‘मिशन लस सुरक्षा’ अंतर्गत या लसी दिल्या  गेल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना अतिरिक्त दहा लाख लस देऊन कंपनी देशातील कोविड लस मोहिमेमध्ये वाढ करणार आहे.
    गेल्या महिन्यात कंपनीच्या एजीएममध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता एम. अंबानी यांनी सर्वसामान्यांसाठी लसीकरण करण्याची कटीबद्धता व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या की, या देशव्यापी अभियानाची अंमलबजावणी करणे खूप मोठे काम आहे परंतु हा आमचा धर्म असून, प्रत्येक भारतीयाप्रति आमचे कर्तव्य, सुरक्षितता आणि सुरक्षिततेचे आमचे वचन आहे. आमचा ठाम विश्वास आहे की एकत्रितपणे आपण हे करू शकतो आणि त्यातून लवकरच आपण यातून बाहेर पडू.
     रिलायन्सने लसीकरणासाठी देशभरात १७१ केंद्रे सुरू केली आहेत. रिलायन्स फाउंडेशन आता एनजीओमार्फत १० लाख डोस देणार आहे. प्लांट जवळील लोकांना आणि सर्वसामान्यांसाठी ही लस तैनात केली जातील.
     ‘मिशन लस सुरक्षा’ अंतर्गत या लसीचे दहा लाख डोस दिले गेले आहेत. कंपनीच्या ९८ टक्के कर्मचार्‍यांना लसीचा कमीतकमी एक डोस मिळाला आहे. कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना लसीकरणाच्या कक्षेत येतात. याशिवाय ही कंपनी ऑफ-रोल कर्मचार्‍यांना, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही विनाशुल्क लसीकरण देत आहे.
      रिलायन्स फाऊंडेशन कोविडला रोखण्यासाठी अनेक आघाड्यांवर काम करत आहे. यात १ लाख रूग्णांना पुरेल इतक्या ऑक्सिजनचे विनाशुल्क उत्पादन केले जात आहे. यासह, त्यांनी देशभरात २००० कोविड केअर बेड्सची देखभाल करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. याशिवाय कोरोनाबाधितांना ७.५ कोटी भोजन देखील दिले आहे २०१९-२०२० दरम्यान देशातील एकूण सीएसआर खर्चापैकी रिलायन्सचे ४ % एवढे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
——————————————————- 

ReplyForward

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!