कळंबा फिल्टर हाऊस येथील ८५ रहिवाशांचे लसीकरण

Spread the love


• महानगरपालिका, शेल्टर असोसिएट्स व युनिसेफ इंडियाचे सहकार्य
कोल्हापूर • प्रतिनिधी
     महानगरपालिका, शेल्टर संस्था व युनिसेफ इंडिया यांच्या माध्यमातून गुरुवारी (दि.१२) कळंबा फिल्टर हाऊस येथील स्लम भागातील ८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
     स्लम भामागामध्ये लसीकरण जागृती आणि प्रदान मोहिमेचे उदघाटन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपआयुक्त निखील मोरे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. अमोल माने, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्पिता खैरमोडे, माजी नगरसेविका सौ.वृषाली कदम, शेल्टर असोसिएटस संस्थेचे प्रमुख सौ. प्रतिमा जोशी, प्रकल्प संचालिका सौ. स्मिता काळे, दुर्वास कदम, आनंद बेडेकर उपस्थित होते.
     शहरी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोना आजार आणि कोरोनावरील लस संदर्भात अनेक संभ्रम आहेत. त्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांचे लस घेण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे शेल्टर असोसिएट्स संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या संस्थेने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये कोरोना लसीबाबत जनजागृती केली आहे. महानगरपालिकेच्या सहकार्याने झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांसाठी लस उपलब्ध करून देत आहे. झोपडपट्टीमध्येच लसीकरण महापालिकेने सेवा उपलब्ध केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. स्लम भागामध्ये लस उपलब्ध झाल्यामुळे वयस्कर तसेच अपंग व्यक्तींना सुद्धा लस घेता आली.
      स्लम भागामध्ये शेल्टर संस्थेद्वारे पथनाट्य, लसीकरण संदर्भात गाणी, पपेट शो, सापशिडी, चालता बोलता आदी खेळ – कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच रिक्षाद्वारे व लसीकरणचा mascot परिधान करुन जनजागृती करण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने लसीकरण संदर्भात माहिती देवून लस घेण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यात आले.
     यावेळी मंगल निकम, शंकर श्रीमंगले, गायत्री पवार, मेघा लोंढे, नीता देशमुख, सागर पाटील, प्रियांका सतोसे, नूरजहाँ कलदगी, राम गुमलवाड, रचना कांबळे, प्रतिभा कांबळे, प्रथमेश पाटील, महेश भोजे आदी उपस्थित होते.
     शेल्टर असोसिएट्स ही संस्था १९९४ पासून महाराष्ट्रातील शहरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे. संस्थेने आतापर्यंत महाराष्ट्रातील ७ शहरांमध्ये २३००० पेक्षा अधिक शहरी कुटुंबांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून दिले असून त्यापैकी ४०००० पेक्षा अधिक वैयक्तिक शौचालय शहरात उपलब्ध करून दिले आहेत.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!