डी.वाय.पाटील इंजिनीरिंग कॉलेजतर्फ़े अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियासंदर्भात रविवारी वेबिनार


कोल्हापूर • प्रतिनिधी
     अभियांत्रिकी हा कौशल्याधारित अभ्यासक्रम असल्यामुळे आजच्या काळात या क्षेत्रात अनेक रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी आहेत. नुकतीच १२ वी ची  सीईटी परीक्षा झाली असून पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये याबाबत काही संभ्रम आहेत.  कोरोनाच प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असून जागतिक उत्पादन पूर्वपदावर येत आहे. यामुळे अभियांत्रिकीच्या सर्वच क्षेत्रांत अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.
    डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,कोल्हापूर येथे  “अभियांत्रिकी प्रवेश २०२०” संदर्भात ऑनलाइन मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. कार्यशाळा रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. याच विषयावर डी. वाय. पी. ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
   या वेबिनार च्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना अभियांत्रिकी म्हणजे काय, अभियांत्रिकीच्या विविध शाखा व त्यांचा सहसंबंध काय आहे? तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पात्रतेचे बदललेले निकष आणि शासनाची केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (कॅप) याबद्दल मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय निवडताना घ्यावयाची काळजी आणि कोविड-१९ चा गुणवत्ता यादीवर होणारा परिणाम यावरदेखील मार्गदर्शन केले जाणार आहे.
       सदरचा वेबिनार विनामूल्य असून यासाठी कोणत्याही नोंदणीची आवश्यकता नाही. विद्यार्थी व पालक हा वेबिनार फेसबुक लाईव्ह, युट्युब लाईव्हवर पाहू शकतात. तसेच विद्यार्थी व पालक प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये देखील भाग घेऊ शकतात.
https://www.facebook.com/dypcetkolhapur
https://instagram.com/dypcet_official
https://www.youtube.com/c/DYPatilCollegeOfEngineeringTechnology
या लिंक वरती फॉलो करा तसेच अधिक माहितीसाठी  ७२४८९५०९६९, ७२४८९४८९५९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *