जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या संवर्धन, प्रात्यक्षिके व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

Spread the love

• निसर्गमित्र संस्थेकडून शाळेस २५ वृक्षांची भेट
कोल्हापूर • प्रतिनिधी
     गिरगांव येथील कै. श्रीमती बी. के. पाटील हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या संवर्धन उपक्रमांतर्गत निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी निसर्ग व मानव या विषयावर माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रत्येकाने विचार वैश्विक, कृती स्थानिक, प्रतिसाद वैयक्तिक या विचारसरणीतून परिसर स्वच्छता आणि परसबागेतील वनौषधीची उपयुक्तता तसेच सण व उत्सव पर्यावरणपूरक व विधायक पद्धतीने साजरे करण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या परसबागेमध्ये वनऔषधीचे रोप लावावे असे आवाहन केले. 
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच महादेव कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच माधवराव कुरणे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, शरद पवार, शेखर सुतार व मोहन जाधव हे प्रमुख  उपस्थित होते. यावेळी कस्तुरी जाधव या विद्यार्थिनीने कुर्डू व भारंगी या रानभाजीचा तयार केलेला बुके मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आला.
      शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी निसर्गमित्रचे युवा सदस्य भारत सुनील चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त २५ वनऔषधी वृक्ष शाळेस भेट देण्यात आले. यामध्ये बेल, आपटा, कांचन, शमी, पुत्रजीवी, जांभूळ, रत्नगुंज, शेंद्री, हादगा, टाकळी, मायाळू इत्यादी वनऔषधी, रंग देणारे वृक्ष व रानभाज्याची झुडपे व वेलींचा समावेश आहे. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक के. बी. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरितसेनेचे समन्वयक जे.एन. कुंभार यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन सर्वश्री अभय कोतनीस, सुनील चौगुले, शिवतेज पाटील, प्रथम चौगुले, शोएब शेख, यश चौगुले यांनी केले. एस. डी. गायकवाड यांनी आभार मानले.
                       रानावनात निसर्ग भ्रमंती…..
     दरम्यान, जागतिक आदिवासी दिनानिमित्त दुपारच्या सत्रात गिरगाव परिसरातील रानावनात निसर्ग भ्रमंती करण्यात आली. या भ्रमंतीमध्ये मोरशेंड, काटेकोळशिंदा, नाल, कुर्डू, वाघाटी, भारंगी, पात्री, टाकाळा, आघाडा, केना, चिचूर्डी, भोकर, बांबू, कानफुटी रानपोकळा, गुळवेल इत्यादी रानभाज्या आढळून आल्या. त्यानंतर काही रानभाज्यांची पाककृतीची प्रात्यक्षिके आदर्श सहेली मंचच्या कस्तुरी अलका जाधव, अस्मिता आशाताई चौगुले यांनी दाखवली. यावेळी उपस्थितांनी रानभाज्यांचा आस्वाद घेतला.
——————————————————- Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!