वनस्पतींच्या नावाने परिचित ७३ गावांना भेटी

Spread the love

• ६१ प्रकारच्या मूळ वाणांचा खजिना जतन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील निसर्ग मित्र संस्थेतर्फे  २०२० – २१ या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष २०२० व स्थानिक फळे व भाजीपाला संवर्धन वर्ष २०२१ या वर्षांनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील वनस्पतीच्या नावाने परिचित सुमारे ७३ गावांना भेटी देण्यात आल्या. या भेटीदरम्यान अनेक फळे, पालेभाज्या, वनौषधी, कडधान्य, स्थानिक पिके इत्यादी वनस्पतीतील सुमारे ६१ मूळ वाणांचा खजिना स्थानिक नागरिकांकडून जतन केल्याचे आढळले आहे. यातून सर्वच वाणांचा भविष्यकाळात लोकसहभागातून जतन करून संवर्धन करण्याचा  संस्थेचा मानस आहे.
      भेटीदरम्यान आढळलेले ठळक मुद्दे
१. अनेक जेष्ठ नागरिक व कृतिशील शेतकऱ्यांकडून विविध वाणांचे जतन.
२. अनेक वाणांचे महत्व व उपयुक्ततेबद्दल माहितीचा अभाव आहे.
३. अनेक गावांमध्ये गावच्या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही.
४. अनेक गावांमध्ये वनस्पती संपदा बऱ्यापैकी टिकून आहे. पण नव्याने स्थानिक वृक्षांना प्राधान्य दिले जात नाही.
५. अनेक गावातून परसबागेचे अस्तित्व कमी झालेले आहे.
६. शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे नव्या पिढीचा कल परंतु अल्प प्रमाणात प्रयत्न आहेत.
७. स्वच्छता व कचरा व्यवस्थापन विषयी थोडीफार जागृती पण कृतीचा अभाव आहे.
८. आपत्ती व्यवस्थापनाविषयी सखोल माहितीचा अभाव दिसून आला.
९. शालेय शिक्षणाविषयी व्यापक जागृती पण व्यवस्थापन शिक्षणाचा अभाव आहे.
१०. आरोग्याविषयी अल्पशी जागृती आहे.
११. देवराई संवर्धनाविषयी जागृती आहे. पण निसर्ग निर्मितीपेक्षा भौतिक प्रगतीकडे वाटचाल दिसून येते.
१२. पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन सक्षम करणे गरजेचे आहे.
१३. तरुण मंडळ, महिला मंडळ यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज.
१४. भविष्यात वनस्पतींच्या नावाने परिचित असणाऱ्या गावात स्थानिक जैवविविधता निर्माण करणे काळाची गरज आहे.
       या मोहिमेमध्ये सर्वश्री दिलीप पेटकर, पराग केमकर, मोहन जाधव, खंडेराव हेरवाडे, विनायक सनगर, अस्मिता चौगुले, नरेंद्र भद्रापुरे, रणजित कालेकर, विजय रानमाळे, अवधूत वीर, शहाजी माळी, आनंदा ठोंबरे, दिनकर मोहिते यांचा सहभाग होता.  
               ——————
              दुर्मिळ वनस्पती
     महाळुंगे, हनुमान फळ, मोह, खडशिंगी, हूंब, पाडळ, पपनस (बम्पर), रक्तचंदन, तीवर, उक्षी, साळवन.
              वनौषधी वनस्पती
     वड, पिंपळ, बेल, कवट, अर्जुन, वेखंड, रिठा, जांभूळ, काटेसावर, पळस, शमी, ऐन, आपटा, शेंद्री, गोंदणी, रुई, कणेरी.
                     फळे
      फणस, आंबा, पेरू, चिबूड, कोकम, आवळा, करांदा, कॉफी, बोर, करवंद, चिंच.
               पिक वनस्पती
     वांगी, मका, वरणा, आले, नाचणी, वरी, साळ भात, आजरा घनसाळ, मिरची, बटाटा, रताळे.
                   रानभाजी
      कोहळा, टाकळी, कडवी, राजिगरा, करंबळी शेंग, गोमाटी, वाघाटी.
                मसाला वनस्पती
       मिरवेल, हळद, त्रिफळा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!