राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     राहुरी (अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नूतन कुलगु्रु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी गुरुवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी डॉ.  पाटील यांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.  
     कुलगुरू डॉ.पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेएकंद येथील आहेत. यापूर्वी ते भारतीय कृषी अनुसंधान परिषद येथे संचालक म्हणून कार्यरत होते. कृषी विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान विविध विषयांच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यास मोठी संधी असल्याचे कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले.
    कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभाग, रेशीमशास्त्र, जैविक कीड नियंत्रण तसेच विविध कृषी पीककिडींचा बंदोबस्त, मत्स्य विज्ञान आणि वनस्पतीशास्त्रामध्ये विविध जाती, पिके, औषधी वनस्पती, सुगंधी तेल, केळी, टिश्यूकल्चर इत्यादीबाबत संशोधन व सहकार्यास मोठा वाव आहे.  तसेच,जैवतंत्रज्ञान, ॲग्रोकेमिकल, पेस्ट मॅनेजमेंट, फूड व नॅनो सायन्समध्ये देखील संशोधन सहकार्य करता येईल.
      यावेळी प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही. एस मन्ने, सेंटर ऑफ  एक्सलन्स ॲन्ड इनक्युबेशनचे समन्वयक डॉ. ए. डी. जाधव आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!