क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी विद्यानंद बेडेकर यांची फेरनिवड

Spread the love


  कोल्हापूर • प्रतिनिधी                                                                             
       पश्चिम महाराष्ट्रतील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेली क्रिडाई कोल्हापूरने कॊल्हापूर शहराच्या विकासाबरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. अशा क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बरीच वर्ष बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेले बेडेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे विद्यानंद बेडेकर यांची फेरनिवड करण्यात आली.
      दि.३१ मार्च २०२१ रोजी झालेल्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये सन २०२१-२०२३ सालाकरीता नवीन  मॅनेजिंग कमिटीची निवड करण्यात आली. विद्यानंद बेडेकर यांनी क्रेडाई कोल्हापूरच्या संचालक, सचिव, उपाध्यक्ष व अध्यक्ष अशा विविध पदांवर गेली १२ वर्षे काम केले आहे. त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या विविध अडचणीबाबत सरकारी व स्थानिक पातळीवर चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून, कोल्हापूर शहराच्या विकासाबरोबर अनेक सामाजिक उपक्रमात हिरीरीने भाग घेतलेला आहे.
       क्रिडाई  कोल्हापूरच्या कामाचा वाढता व्याप पाहून प्रथमच या मॅनेजिंग कमिटीमध्ये दोन उपाध्यक्षांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे  –
उपाध्यक्ष- प्रकाश  देवलापूरकर (आयोध्या बिल्डर्स), उपाध्यक्ष- चेतन वसा (सुरज इस्टेट डेव्हलपर्स), सचिव –  प्रदीप भारमल (पी. बी. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स), खजानीस- गौतम परमार (परमार इन्फ्रा), सहसचिव- श्रीधर कुलकर्णी (राईट अँगल कन्स्ट्रकशन) व निखिल शहा (सिद्धी डेव्हलपर्स), सहखजानीस- पवन जामदार (जे. के. असोसिएट्स), मॅनेजिंग कमिटी सदस्य – के. पी. खोत (त्रिमूर्ती डेव्हलपर्स), श्रेयांस मगदूम (एस. ए. मगदूम प्रमोटर्स अँड बिल्डर्स), संदीप मिरजकर (गुरुबल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स), सोमराज देशमुख (देशमुख डेव्हलपमेंट्स), अजय डोईजड (शिवशक्ती डेव्हलपर्स), महेश पोवार (जय कन्स्ट्रकशन), गणेश सावंत (श्रीगणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स), लक्ष्मीकांत चौगले (चौगुले होसमनी  कन्स्ट्रकशन), श्रीराम पाटील (श्रीराम बिल्डर्स).

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!