कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू विशांत मोरे व रणजीत निकम यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विशांत मोरे याची यापुर्वी सन २०१५-१६ व २०१६-१७ यावर्षीदेखील महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली होती. विशांत मोरेने यापुर्वी महाराष्ट्र १४,१५,१७,१९ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. महाराष्ट्र २२ वर्षाखालील संघाचे कर्णधारपददेखील भुषविले आहे. तसेच सलग दोन वर्षे २५ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती. २०१६-१७ साली मुश्ताक अली व विजय हजारे स्पर्धा खेळला आहे. विशांत हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. विशांतची झोनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये कॅम्पमध्ये निवड झाली होती.तसेच नॅशनल किक्रेट अॅकॅडमीमध्येदेखील कॅम्पसाठी निवड झाली होती.
रणजीत निकम २०१० पासून कोल्हापूर जिल्हा १६,१९,२३ व खुला गट संघातून खेळत आहे. सन २०१९-२० यावर्षी २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघातून खेळताना त्याने गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेश या संघांविरूध्द सलग तीन सामन्यात तीन शतके झळकावली. या कामगिरीच्या जोरावर गतवर्षी त्यांची महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली होती. या कामगिरीच्या जोरावर तसेच या वर्षीच्या कॅम्पमध्ये व सराव सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यांची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र संघ क गटात
महाराष्ट्र संघाचा क गटामध्ये समावेश आहे. या गटात गुजरात, छत्तीसगड, हिमाचलप्रदेश, बडोदा, उत्तराखंड या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे सर्व सामने वडोदरा, गुजरात येथे होणार आहेत