डॉ.संभाजी खराट यांची पत्रकारिता अध्यासनाला भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      राज्य शासनाच्या विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाला सदिच्छा भेट दिली. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सहायक संचालक फारुख बागवान, माहिती सहायक एकनाथ पोवार, छायाचित्रकार रोहित कांबळे उपस्थित होते.
      डॉ. खराट यांनी ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनच्यावतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. बदलत्या काळाची गरज ओळखून सुरू केलेल्या डिजिटल पत्रकारिता अभ्यासक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अध्यासनाने सत्यशोधक पत्रकारितेवर यापुढील काळात संशोधन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 
      डॉ. खरात यांनी यानंतर पत्रकारिता व जनसंवाद विभागाला भेट दिली. याठिकाणी विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे उपस्थित होत्या. विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षालाही त्यांनी भेट दिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!