विवेकानंद कॉलेजतर्फे “शिक्षक आपल्या दारी” उपक्रमाचे आयोजन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेजच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चा करण्यासाठी “शिक्षक आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन २ ते १० मे या कालावधीत करण्यात आले. 
      यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेगवेगळे ग्रुप तयार करुन कोल्हापूरच्या आसपास असणाऱ्या केर्ली, शिरोली, नागाव, गांधीनगर, वळिवडे, रुकडी, शिये, भुयेवाडी, निगवे, वडणगे, जोतिबा, हुपरी, रेंदाळ, कसबा बावडा इत्यादी  गावात पाठविण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालकांशी हितगुज साधण्यात आले.
       त्यानंतर संबंधीत गावातील या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची शिक्षकांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीविषयी महाविद्यालय राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा, कला, वाणिज्य व विज्ञान पदवीनंतर कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी पालकांनीही सूचना केल्या आणि “शिक्षक आपल्या दारी” या महाविद्यालयाच्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.
       या उपक्रमाचे आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व आय.क्यु.ए.सी. समन्व्‍यक डॉ. श्रुती जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाच्या या उपक्रमास विद्यार्थी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!