विवेकानंदमध्ये ‘क्यूर स्टडीज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्र संपन्न

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
      येथील विवेकानंद कॉलेजच्या इंग्रजी विभागाने क्यूर स्टडीज : स्वरुप, व्याप्ती आणि भविष्य या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.
      यावेळी बोलताना बीजभाषक प्रसिध्द लेखिका रुथ वनिता म्हणाल्या,भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्था ही करार नसून एक संस्कार आहे, याउलट पाश्चात्य संस्कृतीमध्ये विवाह हा करार आहे. यावेळी त्यांनी विविध उदाहरणातून नातेसंबंधाबद्दल भाष्य्‍ केले. 
      त्या पुढे म्हणाल्या की, सर्व नाती समान आहेत व नात्यांचा सन्मान केला पाहिजे.  इंग्रजी साहित्यांमध्ये समलिंगी विषयावरती लिखाण केलेले दिसून येते. समाजामध्ये समलिंगी व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.
       या चर्चासत्राचे उदघाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय मनोगतात त्या म्हणाल्या की, विवेकानंद कॉलेज सातत्याने समाजातील उपेक्षित वर्गाबद्लच्या समस्या व उपाययोजना याबाबत सेमीनार, कार्यशाळा घेवून जनजागृती करीत आहे. 
      प्रमुख पाहुण्या म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. तृप्ती करेकटृी होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, समलिंगी नाती व विवाहाचे प्रत्य्‍क्ष व अप्रत्य्‍क्ष दाखले प्राचीन साहित्यात पुष्कळ आढळतात. आपण ते डोळसपणे आणि धाडसाने पहायला हवेत व स्वीकारायला हवेत. 
      दुपारच्या सत्रात बोलताना कलकत्ता येथील प्रसिध्द लेखक कौस्तुव बक्षी हे महणाले, समलिंगींची एक भाषा असते. त्याचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे.
      या सत्राच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ. मंगेश कुलकर्णी हे होते. दुपारच्या दुसऱ्या सत्रात बोलताना मुंबई विद्यापीठाचे डॉ. सचिन लबडे म्हणाले, भारतीय चित्रपट माध्यमातून समलिंगी व्यक्तींचे चित्रण केलेले दिसून येते.
      स्वागतपर भाषण विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी केले. प्रास्ताविक IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. कविता तिवडे व डॉ.प्रभा पाटील यांनी करुन दिली. आभार प्रा. सुप्रिया पाटील यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा. सलमा मणेर व प्रा.माधुरी पवार यांनी केले.
      या ऑनलाईन चर्चासत्रासाठी भारतातून ४५० प्राध्यापक व साहित्यप्रेमी उपस्थित होते. समारोप पेपर रीडींग सेशनने झाला. यासाठी अध्यक्ष म्हणून डॉ.मनिषा पाटील, डॉ.सुनिता वेल्हाळ या ऑनलाइन उपस्थित होत्या. या चर्चासत्रासाठी डॉ. विशाल वाघमारे व प्रा. राजश्री पाटील यांचे सहकार्य लाभले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!