“गोकुळ”साठी उद्या मतदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची पंचवार्षिक निवडणूक रविवारी (दि.२) होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ७० मतदान केंद्रावर यासाठी मतदान होणार आहे. संचालक पदाच्या २१ जागांसाठी ३६५६ इतके मतदार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि ४) कसबा बावडा रमणमळा येथील बहूउद्देशीय सभागृहात होईल.
      सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीचे चिन्ह पतंग तर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे चिन्ह कपबशी हे आहे. दोन्ही आघाडीमध्ये जोरदार चुरस असून निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
      सत्तारुढ आघाडीचे नेते आमदार पी.एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक, अरूण नरके, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आम. अमल महाडिक, माजी आम. संजय घाटगे तर विरोधी आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, खासदार प्रा.संजय मंडलिक, आम. विनय कोरे, आम. प्रकाश आबिटकर, आम. राजेश पाटील, आमदार राजू आवळे, माजी आम. चंद्रदीप नरके आदींनी आघाडीची मोट बांधली आहे.
                    ———-
      सत्तारूढ आघाडीचे उमेदवार –
    • सर्वसाधारण गटातील उमेदवार : चेअरमन रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, उदय निवासराव पाटील, सत्यजित सुरेश पाटील, अंबरिश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रविश पाटील-कौलवकर, प्रतापसिंह शंकरराव पाटील, प्रकाश चव्हाण, राजाराम भाटले, रणजित बाजीराव पाटील
• इतर मागासवर्गीय गट : पांडुरंग दाजी  धुंदरे.
• भटक्या विमुक्त जाती जमाती : विश्वास जाधव
•अनुसूचित जाती जमाती गट : विलास कांबळे.
•महिला गट : अनुराधा पाटील, शौमिका महाडिक.
                ————
         विरोधी आघाडीचे उमेदवार –
      • सर्वसाधारण गटातील उमेदवार :  विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील – चुयेकर, एस. आर. पाटील, प्रकाश रामचंद्र पाटील, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, नविद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, रणजितसिंह  कृष्णराव पाटील, अभिजीत तायशेटे, नंदकुमार ढेंगे, किसन चौगले, बाबासाहेब चौगुले, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगुले
• इतर मागासवर्गीय गट : अमरसिंह यशवंत पाटील
• भटक्या विमुक्त जाती जमाती : बयाजी शेळके.
• अनुसूचित जाती जमाती : सुजित मिणचेकर.
• महिला गटातील उमेदवार : सुश्मिता राजेश पाटील, अंजना रेडेकर.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!