वृक्षरोपवाटीका, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन पुस्तक प्रकाशित

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष व वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर लिखित “वृक्षरोपवाटीका, वृक्षारोपण, आणि वृक्षसंवर्धन” हे पुस्तकाचे ५ जून या पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून प्रकाशित करण्यात आले.
      पुस्तकाचे प्रकाशन निसर्गमित्र संस्थेचे संस्थापक सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. वृक्षसंपदा टिकवून ठेवण्याकरिता या पुस्तकाची मोठी मदत सर्वांना मदत होईल, असे मत शिपूरकर यांनी नमूद केले.
     या पुस्तकामध्ये वृक्षसंपदा, वृक्षरोपवाटीका, विविध रोपांची तयार करण्याची पद्धत, वृक्षारोपण आणि लागवड करण्याच्या पद्धती, वृक्षसंवर्धन, वृक्षांविषयी गैरसमज या संबंधित अनेक विषयांवर या शास्त्रीय माहिती मांडण्यात आली आहे, अशी माहिती लेखक डॉ. बाचूळकर यांनी दिली.
     यावेळी संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी हे पुस्तक निसर्गप्रेमी नागरिकांना संस्थेच्यावतीने देणगी शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
                     ……….
         ऑनलाईन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…..
      गेल्या आठवड्यातच निसर्गमित्र संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय वनस्पती व पालेभाज्या संवर्धन वर्ष निमित्ताने  “प्रश्न तुमचे उत्तर आमचे” ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमालादेखिल नाशिक, पुणे, आणि कोल्हापूर शहर परिसरातून अनेक निसर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे शास्त्रीय पद्धतीने समाधानकारक उत्तरे दिली.
                …………
      “वृक्षरोपवाटीका, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन” या पुस्तकासंदर्भात अधिक माहितीसाठी २८२३/४८ बी वॉर्ड, महालक्ष्मीनगर, गोखले कॉलेज रोड, कोल्हापूर याठिकाणी किंवा ९४२३८५८७११ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
———————————————–

9423858711 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!