कोल्हापूर • प्रतिनिधी
श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे जीवन व कार्य याचे स्मरण करण्याकरीता वीस कोटी टन दुधासाठी वीस कोटी पावले चालण्याचे जगातील सर्वात मोठ्या वॉकेथॉनचे आवाहन एन.डी.डी.बी (आनंद) यांचेमार्फत आज करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गोकुळतर्फे ताराबाई पार्क कार्यालय येथून ताराराणी चौक येथे सकाळी सहा वाजता वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक अजित नरके, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी आस्थापना व्यवस्थापक डी.के.पाटील, संघाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.