गोरगरिबांच्या आशीर्वादावरच मोठा झालो: मंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता

Spread the love• कागलमध्ये निराधारांना अनुदान मंजुरी पत्रांचे वाटप
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     दीनदलित – वंचितांच्या सेवेच्या पुण्याईवर पाच वेळा आमदार झालो. गोरगरिबांच्या या आशीर्वादावरच मोठा झालो, अशी कृतज्ञता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. माझी आणि सर्वसामान्य – गोरगरीब जनतेची नाळ घट्ट जुळलेली आहे, असेही ते म्हणाले.
      कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ३०० लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी पत्रांच्या वितरण कार्यक्रमात मंत्री हसन  मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
      प्रास्ताविकपर भाषणात भैय्या माने म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरिबांच्या या सेवा कार्याचे काम सबंध महाराष्ट्रात कागल विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे झाली आहे.      
                         ते तर त्यांचे षड़यंत्र……
     मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वृद्धापकाळाने जर्जर झालेल्या म्हाताऱ्या माणसांना, अपंग, मतिमंद रुग्णांना चार घास सुखाचे मिळावेत, या भावनेने आपण ही योजना प्रभावीपणे राबवली होती. परंतु दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तालुक्यातील दोन हजार लाभार्थ्यांना विरोधकांनी तक्रारी करून व चौकशी लावून अपात्र केले होते. माझ्यापासून गोरगरीब माणूस तोडून, विधानसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठीचे ते तर षड़यंत्र होते.
      यावेळी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, संजय गांधी निराधार समितीचे सदाशिव तुकान, साताप्पा कांबळे, राजू आमते, नारायण पाटील, बाळासाहेब दाईंगडे , सौ. सारिका प्रभू भोजे, दलितमित्र प्रा. एस. आर. बाईत, पुंडलिक पाटील हे सदस्य उपस्थित होते.
      स्वागत माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी केले. 
——————————————————- Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!