कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळाने गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटीलउपस्थित होते.
या भेटीप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले कि, गोकुळने दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून ग्राहकापर्यंत निर्माण केलेले जाळे आणि त्यातील व्यवस्थापन कौशल्य हे कौतुकास्पद आहे. गोकुळ ही संस्था सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करताना दूध उत्पादक शेतकऱ्यांची हित साधण्याचे प्रभावी काम गोकुळने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे केलेले आहे. म्हणूनच गोकुळचे ग्रामीण विकासामध्ये मोठे योगदान आहे. अशा संस्थेचा विस्तार होणे काळाची गरज आहे व गोकुळच्या प्रस्तावित भोकरपाडा एम.आय डी.सी मधील भुखंडा संदर्भातील सदरचे सर्व प्रस्ताव मंजुर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, सुजित मिणचेकर, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, मुंबई शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील, सिव्हीलचे व्यवस्थापक प्रकाश आडनाईक उपस्थित होते.