इतर दूध संघाशी चर्चा करूनच दूध विक्री दरवाढीचा निर्णय घेवू: विश्वास पाटील


कोल्हापूर • प्रतिनिधी
     गोकुळची दूध विक्री ही इतर सहकारी दूध संघांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे अमुलने दूध विक्री दरवाढीच्‍या घेतलेल्या निर्णयामुळे गोकुळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले होते. पण आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये वारणा, चितळे, राजारामबापू व इतर सहकारी दूध संघाशी दूध विक्री दरवाढीबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्‍याचे सर्वांचे एकमत झाले व इतर संघाशी चर्चा करण्याचा संपूर्ण अधिकार चेअरमन विश्वास पाटील यांना देण्यात आले.  
     गोकुळच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयामध्‍ये संघाच्‍या संचालक मंडळाची दूध विक्री दरासंदर्भात बैठक पार पडली. दोन दिवसांपूर्वी अमुल दूध संघाने राज्यात दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजीत करण्‍यात आली होती.
     यावेळी बोलताना श्री. पाटील म्‍हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिल्लक दूधाचा प्रश्न, पेट्रोल डिझेलची दरवाढ यामुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यासर्व बाबींचा विचार करून दूध विक्री दरात वाढ करावी का ? याबाबत संचालक मंडळाचा  बैठकीत चर्चा झाली.
     बैठकीस गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील (आबाजी), जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील – चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेगे, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो उर्फ वसंत खाडे, चेतन नरके, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर व संघाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *