मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दुकाने लवकरात लवकर उघडण्यास परवानगी देऊ

Spread the love


• ना.सतेज पाटील यांचे चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीमध्ये आश्र्वासन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मांडून कोल्हापूर जिल्ह्यातील शहर युनिट वेगळे करून लवकरात लवकर सरसकट सर्व व्यापारी दुकाने उघडण्यासंबधी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील सांगितले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
      कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि सर्व संलग्न व्यापारी संघटना यांनी आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमवेत दुकाने उघडण्यास लवकरात लवकर परवानगी मिळावी यासाठी बैठक आयोजीत केली होती. यावेळी खासदार संजय मंडलिक व आ.चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
     कोरोनाच्या काळात व्यापाऱ्यांची दुकाने ८० दिवस बंद असल्याने व्यापाऱ्यांना फार मोठे आर्थिक संकट सहन करावे लागले असून व्यापाऱ्यांची परिस्थिती डबघाईला आलेली आहे. राज्यशासनाने दि.६ एप्रिल २०२१ रोजी नियमावली जाहीर करून एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केला. तसेच दि. ४ जून २०२१ रोजी नवीन नियमावली जाहीर करून व्यापारीवर्गावर अन्याय केला आहे. सध्या कोल्हापूर शहरातील टेस्टींग रेट ८.४८ टक्के आला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने या आठवड्यात सम-विषम पध्दतीने चालू करणार व पुढील आठवड्यापासून सरसकट सर्व दुकाने चालू करणार. तसेच, कोल्हापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेचा आर्थिक वर्ष २०२१-२२ चा घरफाळा माफ करावा. तसेच कोल्हापूर शहरातील सरसकट सर्व दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी, यांसह व्यापाऱ्यांच्या अन्य समस्या सोडविण्याची मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सर्व व्यापाऱ्यांच्यावतीने केली.
     यावेळी खा. संजय मंडलिक व आ. चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आनंद माने व प्रदीपभाई कापडीया, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, कापड व्यापारी असोसिएशनचे सभासद गुरूदत्त देसाई, रेडीमेड व्यापारी असोसिएशनचे सभासद मुरली रोहीडा, इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धडाम, व क्रिडाईचे अध्यक्ष राजूभाई परीख यांनीही मनोगत व्यक्त केले.
     यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार व संजय पाटील, मानद सचिव जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर व राजू पाटील, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, विज्ञानंद मुंढे, राहूल नष्टे, शिवराज जगदाळे, तौफिक मुल्लाणी, प्रकाश केसरकर, संपत पाटील, शांताराम सुर्वे, प्रकाश पुणेकर, अविनाश नासिपूडे, कोल्हापूर इंजिनियरींग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित शाह, ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अभयकुमार अथणे, कोल्हापूर पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरूण सावंत, कोल्हापूर स्पेअर पार्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शहा, स्टेशनरी व कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर अग्रवाल व रेडीमेड गारमेंट असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम निस्सार उपस्थित होते. मानद सचिव धनंजय दुग्गे यांनी सुत्रसंचालन केले.
———————————————– Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!