राजर्षी शाहू ब्लड सेंटरला सर्वोतोपरी मदत करू: आरोग्यमंत्री राजेश टोपे• राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नवीन वास्तूचे उद्घाटन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      सेवाभाव हे राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे वेगळेपण आहे. गेल्या ४५ वर्षांपासून ही संस्था सेवाभावी वृत्तीने कोल्हापूरकरांची सेवा करत आहे. समाजकार्याचा वसा चालविणाऱ्या राजर्षी शाहू ब्लड सेंटरला शासनाच्यावतीने सर्व प्रकारची मदत करू, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
     सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१६) सकाळी अद्ययावत सुविधानी सज्ज झालेल्या राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या या सोहळ्यास ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, आ. ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषद सीईओ संजयसिंह चव्हाण, राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील, सेक्रेटरी महेंद्र परमार यांच्यासह पदाधिकारी व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
     मंत्री राजेश टोपे यांचा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आतापर्यंत १५० आणि १४० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. राजू लाईन्सवाला, वसंतराव चव्हाण, उदय आनंदराव पवार, चिन्मय रविंद्र कागलकर आदी रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.बी. पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात श्री. पाटील यांनी संस्थेचा गेल्या ४५ वर्षातील  कार्याचा आढावा घेतला. संस्थेला येणाऱ्या अडचणी व शासनाच्या मदतीबद्दल त्यांनी मत व्यक्त केले. अनेक रक्तदान संस्था करत असलेल्या गैरकारभाराचा मुद्दा मांडून शासनाने त्याची दखल घेण्याची इच्छा व्यक्त केली.
     कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.
——————————————————-
    
 ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *