रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करू: राजेश क्षीरसागर

Spread the love

•प्रामाणिक रिक्षाचालक सुरेश तोरस्कर यांचा  सत्कार
कोल्हापूर • प्रतिनिधी
      राज्यातील रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना सामाजिक सुरक्षा व कल्याणनिधी योजना पुरविण्यासाठी रिक्षा कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा व्यावसायिकांना न्याय देण्याचा प्रयत्न होता. परंतु रिक्षा व्यावसायिकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना होवूनही, मंडळ कार्यान्वित नसल्याने व त्यातच कोविड-१९ च्या काळातील टाळेबंदीनंतर सर्वसामान्य रिक्षा व्यावसायिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आगामीकाळात अशा संकटांचा सामना करण्यासाठी आणि रिक्षा चालकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी रिक्षा चालकांचे कल्याणकारी मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
      पंचगंगा रिक्षा स्टॉपचे रिक्षाचालक सुरेश तोरस्कर यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग पॅसेंजरला प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणिक रिक्षाचालक सुरेश तोरस्कर यांचा सत्कार करण्यात आला.
     यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले की, कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक अत्यंत प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या अथवा स्थानिक प्रवाशांच्या मौल्यवान किंमती वस्तू, रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे प्रामाणिकपणे परत केल्याच्या अनेक घटना या केवळ कोल्हापुरातच घडतात, हे सुरेश तोरस्कर यांच्यासारख्या प्रामाणिक रिक्षाचालकांची उदाहरणे आपल्यास दिसून येतात. सर्वसामन्य रिक्षाचालकांसाठी तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षा, टॅक्सी, चालकांसाठी सामाजिक सुरक्षा व कल्याणनिधी योजना राबविण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नसताना सदरहू योजना कामगार विभागामार्फत ऑटो रिक्षा, टॅक्सी, व्हॅन, टेम्पो, लॉरीज व खाजगी बसेस चालविणाऱ्या चालकांसाठी लागू करण्याची मागणी करून विधिमंडळ कालावधीत रिक्षा चालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास यशस्वी पाठपुरावा केला आहे. परंतु, रिक्षा व्यावसायिकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना होवूनही, मंडळ कार्यान्वित नसल्याने व त्यातच कोविड -१९ च्या काळातील टाळेबंदीनंतर सर्वसामान्य रिक्षा व्यावसायिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड -१९ च्या काळात रिक्षाचालकांना रु.१५०० चे अनुदान देवून दिलासा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देवून त्यांना व्यवसायात पुन्हा उभारी देण्याकरिता येत्या सहा महिन्यात रिक्षा चालकांचे कल्याणकारी मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करू. यासह योजनेत नोंदणीकृत चालकांना वैयक्तिक अपघात मदत, निवृत्ती योजना, अंत्यसंस्कारासाठी मदत व लग्न कार्यासाठी मदत अशा लाभांचा समावेश करण्यासाठीही पाठपुरावा करू.
     यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, किशोर घाटगे, सुशील भांदिगरे, रियाज बागवान, रवी बावडेकर, तानाजी भोसले, सतीश रायकर, परवेश बागवान, शकील अत्तार, अण्णा गायकवाड, कपिल मुळे आदी उपस्थित हो

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!