“२१ पैकी २१ जागा जिंकू’ : मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांना विश्र्वास

Spread the love


कोल्हापूर  • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांचा पाठिंबा हाच आमचा आत्मविश्वास आहे. या निवडणुकीत “राजर्षी शाहू शेतकरी आघाडी २१ पैकी २१ जिंकेल” असा विश्वास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
      मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. सभासदांचा आत्मविश्वास हाच आमचा आत्मविश्वास आहे. २ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करून तेच विजयी करतील. २१ पैकी २१ जागा जिंकून आमचे पॅनेल विजयी होईल याची खात्री आहे.
      मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, या निवडणुकीच्या विजयाची औपचारिकता आता बाकी आहे. यंदा बदल करायचा हे सभासदांनी ठरवले आहे. २१ च्या २१ जागांवर आमचे उमेदवार विजयी होतील. गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार नाही. सत्ता परिवर्तन करायची हे मतदारांनी ठरवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!