मी खासदार असताना कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला: धनंजय महाडिक

• बास्केट ब्रिजसाठी १९ वेळा निविदा निघाली
कोल्हापूर • प्रतिनिधी
     लोकसभेत मी खासदार असताना कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला आहे. बास्केट ब्रिजसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. पुणे – बंगळूरु महामार्गावरून कोल्हापूर शहरात येण्यासाठी बास्केट ब्रिज मंजूर करून घेतला. आतापर्यंत त्याची १९ वेळा निविदा निघाली परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा ब्रिज झाला नाही. तेंव्हा ब्रिजसंबंधी चुकीची माहिती देणाऱ्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, असे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांचे नाव न घेता टिका केली. पत्रकार परिषदेस भाजपचे महेश जाधव, राहूल चिकोडे व माजी नगरसेवक सत्यजित कदम उपस्थित होते.
     धनंजय महाडिक म्हणाले की, आपण खासदार असताना वेळोवेळी कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी सभागृहात आवाज उठविला. कोल्हापूर शहरात येण्यासाठी बास्केट ब्रिज व्हावा यासाठी केवळ पत्र देऊन नव्हे तर  पाठपुरावा केला. त्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करून संबंधित मंत्री, अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला म्हणूनच १७४ कोटी रुपयांचा ब्रिज मंजूर झाला. त्याच्या १९ वेळा निविदा प्रसिद्ध झाल्या मात्र तांत्रिक अडचणीमुळे हा ब्रिज झाला नाही. तेव्हाच्या खासदारांनी काहीच केले नाही, असे म्हणणाऱ्यांनी बास्केट ब्रिजसह कोल्हापूरात विमानतळ, शिवाजी पूलास पर्यायी पूल, ईएसआय हॉस्पिटल व पासपोर्ट कार्यालय ही कामे कशी झाली याचा विचार करावा. अशा अनेक प्रश्नांसाठी संसदेत प्रत्येकवेळी आवाज उठविला आहे.
    यापूर्वी महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती आणि अमल महाडिक हे आमदार होते. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे होते मात्र आम्ही कोणालाही त्रास दिला नाही. तसेच द्वेषाचे राजकारण केले नाही. राज्यात आज ना उद्या आम्ही सत्तेत येणारच आहोत. एकदा का सत्ता आली की तुम्हाला ते झेपणार नाही, अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना टोला मारला. सोलापूर येथील भीमा सहकारी साखर कारखाना बंद पडावा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कारवाई करावी यासाठी पालकमंत्र्यांनी स्वतःच्या लेटरहेडवर पत्रे दिली तसेच त्यांच्या हस्तक खासदार यांनीही असेच पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेचा दुरुपयोग करून उद्योग अडचणीत आणू नयेत. सत्ता आज आहे उद्या नाही असे म्हणत धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *