अनुप मंडळवर तात्काळ बंदीसाठी स्वतः प्रयत्न करणारः देवेंद्र फडणवीस

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     अनुप मंडळाच्या देशद्रोही व धर्मविरोधी कारवाया अजिबात सहन केल्या जाऊ शकत नाहीत. जैन धर्म आणि हिंदू धर्मा संदर्भात चालत असलेल्या अपप्रचार तात्काळ थांबणे आवश्यक आहे, यासाठी या राष्ट्रदोही संघटनेवर देशभरात बंदी घालण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असे आश्‍वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय जैन संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.
     ते पुढे म्हणाले की, या कामासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळाच्या समवेत भेट घेऊन आपण तातडीने पुढील कारवाई करण्यास त्यांना विनंती करू.
     राष्ट्रीय जैन संघठनेने संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांच्या मार्फत ५०० हून अधिक ठिकाणी निवेदन देण्याचे आंदोलन केले होते, त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी ललित गांधी यांच्या नेतृत्वात आमदार मंगलप्रभात लोढा व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्यासमवेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात संदीप भंडारी, डी.सी. सोळंकी, महेंद्र जैन, रिषभ मारू आदी जैन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!