घोडावत विद्यापीठाच्या कुलसचिवपदी विंग कमांडर (से. नि.) डॉ.संदीप सिंग

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलसचिवपदी विंग कमांडर (से. नि.) डॉ. संदीप सिंग यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील उपस्थित होते.
      डॉ.सिंग यांची शिक्षण क्षेत्रातील कारकीर्द १७ वर्षाहून अधिक आहे. डॉ. संदीप सिंग हे उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थीभिमुख सवेंदनशील प्रशासन ही त्यांची खासियत आहे. त्यांनी मार्केटिंग मॅनेजमेंटवर पीएच डी पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांनी इंडियन एअर फोर्समध्ये फ्लयिंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट, स्क्वाड्रन लीडर तसेच विंग कमांडर इत्यादी अनेक महत्वाच्या पदावर काम करीत आपल्या तत्पर , जबाबदार, स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी मध्यप्रदेशमधील एनएससीबी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रजिस्टारपदी काम केले आहे. यानंतर त्यांनी इथिओपिया येथील दिल्ली विद्यापीठात रिसर्च डायरेक्टर, हरियाणातील लिंगय्या विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
       आपल्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच त्यांनी एक उत्कृष्ट समुपदेशक व वक्ता म्हणूनही ओळख निर्माण केली आहे. त्यांनी मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, इंडस्ट्रियल व फायनांशियल मॅनेजमेंटवरती रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी अनेक चर्चासत्रातून व्याख्याने दिली आहेत.
त्यांनी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, नॅक, अकॅडमिक कौन्सिल, बोर्ड ऑफ स्टडीज इत्यादी नामवंत समित्यांवर मूल्यमापन अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शखाली ८ विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट ही मानाची पदवी संपादन केली आहे.
      या निवडीबाबत बोलताना कुलगुरू डॉ. अरुण पाटील म्हणाले की, घोडावत विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत शिक्षणतज्ञ, प्राध्यापकांची आम्ही नेमणूक केली आहे. यापुढे विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त करून चांगल्या दर्जाचा पदवीधर तयार करणे हे आमचे ध्येय आहे त्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू.
       या निवडीबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील  यांनी त्यांचे अभिनंदन केले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!