मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात ५० बेडसह ऑक्सीजन जनरेटर प्लांट व सिटीस्कॅन बसविणार: मंत्री मुश्रीफ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      सध्या २५ बेड असलेल्या मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात ५० बेडस ऑक्सिजन जनरेटर प्लांट व सिटीस्कॅन यासह अन्य अनुषंगिक सुविधा ठरविणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
      मुरगुडमध्ये कोरोना परिस्थितीची आढावा बैठक व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कोविड केअर केंद्राला १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
      मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, अनपेक्षितपणे आलेल्या या जागतिक महामारीशी गेल्या सव्वा वर्षापासून आपण लढत आहोत. पहिली लाट संपल्यानंतर पुन्हा हा रोग येणार नाही, असं वाटलं होतं. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम, समारंभ, निवडणुका यामध्ये खबरदारी घेतली नाही व त्याचे दुष्परिणाम दुसऱ्या लाटेत रूपांतर होण्यामध्ये झाले. अहोरात्र लढणाऱ्या सरकारी डॉक्टर्स व आरोग्य यंत्रणेचेही मंत्री मुश्रीफ यांनी कौतुक केले.
       ते पुढे म्हणाले, आरोग्य व्यवस्था भक्कम केली नाही तर पुढच्या लाटेला फार गंभीरपणे तोंड द्यावे लागेल. तज्ञांच्या अभ्यासानुसार तिसऱ्या फेरीत लहान मुलांना फार धोका आहे. आपण आताही त्याच चुका पुन्हा केल्या तर समाज आपल्याला माफ करणार नाही. जोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेचा धोका आपल्याला कायम आहेच.
      यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, रणजीत सुर्यवंशी, राजू आमते, ॲड. सुधीर सावर्डेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
       आभार नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!