१४ दिवसात २ लक्ष ९४ हजार घरगुती ग्राहकांनी भरले वीज बिल


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महावितरणच्या कोल्हापूर मंडळातील २ लक्ष ९३ हजार ९७७ वीज ग्राहकांनी ४१ कोटी ८५ लक्ष रूपये वीज बिलाचा भरणा करून महावितरणच्या वीज बिल वसूली मोहिमेस प्रतिसाद दिला आहे. त्यातील ७९ हजार ५४८ वीजग्राहकांनी ७ कोटी ७५ लक्ष रूपये ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरले आहे. तर २ लक्ष १४ हजार ४२९ वीजग्राहकांनी ३४ कोटी ११ लक्ष रूपये वीज बिल भरणा केंद्राव्दारे भरले आहेत.
     कोल्हापूर शहर विभागात सर्वाधिक ६७ हजार घरगुती ग्राहकांनी ९ कोटी ४२ लक्ष रूपये वीज बिल भरले आहे. गडहिंग्लज विभागात ५३ हजार ९८६ ग्राहकांनी ९ कोटी १५ लक्ष, कोल्हापूर ग्रामीण विभाग २ मधील ६० हजार ४९० ग्राहकांनी ७ कोटी ३७ लक्ष, कोल्हापूर ग्रामीण विभाग १ मधील ४० हजार ७९५ ग्राहकांनी ६ कोटी ७७ हजार, जयसिंगपूर विभागात २९ हजार ४७३ ग्राहकांनी ५ कोटी २० लक्ष रूपये तर इचलकरंजी विभागातील ४२ हजार २०३ ग्राहकांनी ३ कोटी ९४ लक्ष रूपये वीज बिल भरणा केला आहे. वीजग्राहक महावितरण मोबाईल ॲप, अधिकृत संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने वीजबिलाचा भरणा करू शकतात.
     जानेवारी अखेरपर्यंत ग्राहकांना वीज बिलाची थकबाकी असतानाही अखंडित सेवा दिली. एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता थकबाकी वसूली आवश्यक आहे. ग्राहकांसाठी हप्त्यात वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून दिलेली आहे. तरी ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *