राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने केएमटी कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. यासंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा करण्याची ग्वाही कर्मचाऱ्याना दिली होती. या पाठपुराव्यास यश आले असून, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून केएमटीच्या सुमारे ८०० कर्मचाऱ्याना १६ टक्के वेतनवाढ देण्यात आली आहे. यासह रिक्त असणाऱ्या के.एम.टी. व्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
     के.एम.टी. कर्मचाऱ्यांचे उर्वरित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे मागण्या मान्य झाल्याने केएमटी कर्मचाऱ्यांच्यावतीने राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.  
     यावेळी सुरेश मुधोळकर, नंदू संकपाळ, सुरेश सोनीकर, एम.डी.कांबळे, संभाजी पाटील, सागर वैराट, संजय भास्कर आदी कर्मचारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!