कोल्हापूर • प्रतिनिधी
येथील यशोदा महिला फाउंडेशनच्यावतीने शुक्रवारी (दि.२२) दुपारी तीन वाजता महिलांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा तेजस्वी पार्टे व अर्पिता राबाडे यांनी दिली. मंगळवार पेठेतील सनगर गल्ली तालमीच्या सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थिती आहे. याच कार्यक्रमात कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
यशोदा महिला फाऊंडेशनच्या सभासद असलेल्या महिलांसाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. सहभागी महिलांना डान्स, स्पॉट गेममध्ये सहभागी होता येणार आहे.
——————————————————-