कोल्हापूर • प्रतिनिधी
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार एमएसएमई (MSME) टेक्नॉलॉजी सेंटर, सितारगंज अतंर्गत संजय घोडावत पॉलीटेक्निकमध्ये सौर ऊर्जा तंत्रज्ञानावर राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा एकदिवसीय ऑनलाईन असून मंगळवारी (दि.३१) ठिक ११ ते ३ दरम्यान संपन्न होणार आहे. संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागामार्फत हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यशाळेस सर्व सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन युवक-युवती आयटीआय, डिप्लोमा, डिग्री, सौर ऊर्जा तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा असणारे सहभाग नोंदवू शकतात. या कार्यशाळेस सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर सितारगंजचे आदित्य चौधरी आणि त्यांची टीम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. या कार्यशाळेस नोंदणी करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfhjv87WdwFMW4QwOLFDfZrY0NG-0Za1itXLqow6LURmbs7Zw/viewform या लिंकवर जाऊन आपले नाव नोंदवू शकता. या कार्यशाळेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कार्यशाळेचे समन्वयक प्रा.अजय कोंगे यांनी केले आहे.
===================