शेतमालाच्या गुणवत्तेसाठी उद्या क्यूआर कोडच्या वापराबाबत कार्यशाळा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व फॅमिली फार्मिंग प्रोड्युसर कंपनी, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.१) सकाळी १०:३० वाजता मॅनेज प्रशिक्षण केंद्र, मोरेवाडी, शांतिनिकेतनजवळ, कोल्हापूर येथे शेतमालाच्या गुणवत्तेसाठी आवश्यक असणाऱ्या क्यूआर कोडबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
      या कार्यशाळेचे उद्घाटन सेंद्रीय कृषिभूषण पुरस्कारप्राप्त सुधीर चिवटे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास पारदर्शकता मिळून, ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आज क्यूआर कोडची गरज निर्माण झालेली आहे. क्यूआर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड होय. क्यू आर कोडच्या माध्यमातून शेतकरी थेट ग्राहकांशी जोडला जाऊन ग्राहकांना शेतमालाच्या गुणवत्तेची हमी मिळते तर शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होते.
      या कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथील ईनोटेरा टेक इंडिया या कंपनीच्या सहकार्याने करण्यात आलेले आहे. कार्यशाळेत रजनिश खरे, राज दवे, अजय उजागरे व उदय पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील प्रामुख्याने गुळ, केळी, आजरा घनसाळ भात व काजू उत्पादक शेतकऱ्यांना क्यूआर कोडचा फायदा होऊ शकतो. जिल्ह्यातील संबंधित शेतमाल उत्पादकांनी व उत्पादक कंपन्यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!