कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फार्मसी विभागामार्फत ४ फेब्रुवारी रोजी ”जागतिक कर्करोग दिन” साजरा करण्यात आला. विद्यार्थी व स्टाफ याना कर्करोगाबद्दल माहिती मिळावी व या आजाराबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास कुलगुरू डॉ.अरुण पाटील, स्कुल ऑफ फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. बी. श्रीनाथ, डॉ.अभिनंदन पाटील, प्रा.विद्याराणी खोत, प्रा. टी.एस. जंगम, सर्व स्टाफ, विद्यार्थी व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.बी.श्रीनाथ म्हणाले की, कर्करोग हा गंभीर आजार आहे. प्राथमिक अवस्थेत या रोगावर उपचार होऊ शकतो परंतु जास्त काळ निदान न झाल्यास या आजारामुळे मृत्यू ही ओढावू शकतो म्हणून या रोगाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी, भविष्यात औषधनिर्माणशास्त्र या क्षेत्रामध्ये संशोधनाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात काम करणारा प्रत्येक घटक हा मनुष्याच्या जीवनाशी निगडित आहे. या रोगामध्ये अनेक प्रकार असून वेळीच निदान झाल्यास हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. ऑस्ट्रलियामध्ये महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगावर लस उपलब्ध असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ.अभिनंदन पाटील यांनी या आजाराचे प्रकार व त्याचा मनुष्यावरती होणारा विपरीत परिणाम याची कारणमीमांसा स्पष्ट केली. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सोनाली निरंकारी यांनी केले व आभार प्रदर्शन कु अंकिता कोरे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ.संदीप सिंग, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमीक डीन डॉ.उत्तम जाधव यांनी सर्वांचे कौतुक केले.