भाजपा जिल्हा कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व प्रमुख मार्गदर्शक संदीप जंगम यांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे आराध्यदैवत श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कै. बिंदुमाधव जोशी तथा नाना यांचे स्मरण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कमलाकर बुरांडे यांनी केले. यावेळी त्यांनी ग्राहक दिनाचे महत्व व भाजप कार्यकर्त्यांना या चळवळीची आवश्यकता व सामान्य नागरिकांशी त्यांच्या विविध समस्यांवर ते कसे दिशा दाखवू शकतात ते सांगितले.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष राहूल चिकोडे  म्हणाले, कार्यकर्ता व एक अभ्यासू, जागृत ग्राहक म्हणून आपण कोणतीही वस्तू खरेदी करताना वस्तूची समाप्ती दिनांक व वस्तूचे वजन तपासले पाहिजे. सोने-चांदी यांसारख्या किंमती वस्तू खरेदी करताना हॉलमार्क तपासला पाहिजे. त्याचबरोबर खरेदी केलेल्या वस्तूचे बिल ग्राहकाने आवश्य घेतले पाहिजे. खरेदी करतेवेळी अशा सर्व गोष्टी चोखंदळपणे केल्यास ग्राहकाला नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. त्यामुळे ग्राहक व दुकानदार उद्योजक हे नाते अधिक दृढ होईल. त्यामुळे ग्राहक दिनानिमित्त सर्वांनी ही चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे.
     कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक  संदीप जंगम यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र या चळवळीचा संपूर्ण इतिहास गेली ४५ वर्षे चळवळीने केलेले काम ग्राहक जागृती, ग्राहकांचे हक्क संरक्षण व ग्राहक संरक्षण कायदा १९ ते नवीन अंमलात आलेला कायदा २०२० (ग्राहक संरक्षण कायदा) यातील तरतुदीसह प्रबोधन केले.
     आभार प्रदर्शन ग्राहक पंचायत सदस्या सौ. अस्मिता कुलकर्णी यांनी केले. यावेळी अखिल भारतीय पंचायत सदस्य रविंद्र घाटगे, प्रशांत चौगले, विनायक वाळवेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, अजित ठाणेकर, मंगला निपाणीकर, युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, मंडल अध्यक्ष भरत काळे, विवेक कुलकर्णी, महेश यादव,  विवेक वोरा, गिरीष साळोखे, विराज चिखलीकर, प्रसाद मोहिते, सिद्धांत भेंडवडे, सचिन मुधाले, वल्लभ देसाई, गौरव सातपुते, अमित शिंदे, अजित मुळीक, प्रीतम यादव, अक्षय निरोखेकर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!