सप्तमीला अंबाबाईची इंद्राणी मातृका रूपात पूजा

Spread the love

सप्तमीला अंबाबाईची इंद्राणी मातृका रूपात पूजा
कोल्हापूर • प्रतिनिधी
     आश्विन शुद्ध सप्तमी तिथीला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची इंद्राणी मातृका रूपात पूजा बांधण्यात आली. उद्या (बुधवारी) अष्टमीला देवीचा जागर आहे.
     शारदीय नवरात्रौत्सवात श्री अंबाबाईची विविध रूपात सालंकृत पूजा बांधण्यात येते. मंगळवारी देवीची इंद्राणी मातृका रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक सुकृत मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि विद्याधर मुनिश्वर यांनी बांधली.
     इंद्राणी मातृका ही देवांचा राजा इंद्र यांची शक्ती आहे. हिला ऐंद्री / महेंद्री किंवा वज्री असेही म्हणतात. ही चतुर्भुज असून हत्तीवर आरुढ झालेली आहे. तिच्या हातात वज्र, पाश व कमळ आहेत. ती विविध दागिन्यांनी सजलेली असून मुद्रा आक्रमक आहे. अशा स्वरूपाची ही पूजा आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!