श्री अंबाबाईची चामुंडा मातृका रूपात पूजा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     आश्विन शुध्द नवमीला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची चामुंडा मातृका रूपात पूजा बांधण्यात आली.
     श्रीपूजक मयूर मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यांनी ही पूजा बांधली. या पूजेचा आशय असा की, चामुंडा ही यमाची शक्ती आहे. हिला बऱ्याचदा काली, चामुंडा म्हणूनही ओळखले जाते. ही कोल्ह्यावर आरूढ असून गळ्यामध्ये मुंडमाला तसेच हातात डमरू, त्रिशूळ, तलवार आणि वाडगा आहे. काही धर्मग्रंथामध्ये हिला शंकराची शक्ती मानली गेली आहे व वाघावर आरूढ असेही दाखविण्यात आले आहे. हिचा रंग गडद लाल असून रौद्र चेहरा आहे.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!