कोल्हापूर • प्रतिनिधी
आश्विन शुद्ध द्वितीया तिथीला म्हणजेच नवरात्रातील दुसऱ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची पूजा माहेश्वरी रूपात बांधण्यात आली. ही पूजा अरूण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यांनी बांधली. नवरात्रात देवीची विविध रूपात विशेष अलंकार पूजा बांधण्यात येते. ही सालंकृत पूजा पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
माहेश्वरी मातृका स्वरुपात पूजा…..
शारदीय नवरात्रौत्सवात श्री अंबाबाई देवीची शुक्रवारी माहेश्वरी रूपात पूजा बांधण्यात आली. या पूजेचा आशय असा,
द्वितीय मातृका माहेश्वरी ही भगवान शंकराची शक्ती आहे. ही नंदीवर आरूढ असून तिला चार हात व त्रिनेत्र आहेत. तिच्या हातात त्रिशूल, डमरू, माळा, वाडगा आहेत.