श्री अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
     आश्विन शुद्ध पंचमीला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. कोल्हापूर शहराच्या पूर्वेस असलेल्या टेंबलाई टेकडीवरील श्री त्र्यंबोली-त्र्यंबुली देवीच्या भेटीसाठी श्री अंबाबाई जाते. या पार्श्वभूमीवर आजची पूजा बांधण्यात आली आहे. ही पूजा श्रीपूजक अरूण मुनिश्वर, विद्याधर मुनिश्वर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
     नवरात्रातील पंचमीला म्हणजेच ललिता पंचमीला टेंबलाई टेकडीवर यात्रा भरते. त्र्यंबोली मंदिराजवळ कुष्मांड भेद अर्थात कोहळा फोडण्याचा सोहळा होतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार सर्व सोहळा साजरा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!