शाहूमिलमधील प्रदर्शन पाहून भारावून गेल्या यशस्विनीराजे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त “लोकराजा कृतज्ञता पर्व ” अंतर्गत आयोजित केलेल्या शाहू मिल येथील प्रदर्शनास सोमवारी यशस्विनीराजे छत्रपती यांनी भेट दिली. कोल्हापूरच्या तरुण पिढीने हे प्रदर्शन पाहून समजून घेतले तर शाहूंचे विचार आणि कार्य समजून घेता येईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
       छत्रपती घराण्याचा वंशवृक्ष आणि आपल्या पूर्वजांच्या प्रतिमा, त्याखालील मजकूर काळजीपूर्वक वाचत, अनेक दुर्मिळ फोटोबाबत चिकित्सक चर्चाही त्यांनी प्रदर्शन पाहताना केली. शाहू महाराजांच्या आई, आजी, पणजी यांच्या फोटोसह अनेक दुर्मिळ फोटोचा फोटो त्यांनी आपल्या संग्रही मोबाईलमध्ये घेतला.
      शाहू मिल पायाभरणीच्या दगडावरील मजकूर, फोटोतील ठिकाण, व्यक्ती, विविध आदेशातील मजकूर अभ्यासपूर्वक समजून घेत होत्या.
       प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध दुर्गुळे आजींची आस्थेने विचारपूस करत पुढे झाल्या. गंगावेश येथे आम्हांला राजाराम महाराजांनी जागा दिली, घरं दिली असे आजींनी सांगितले. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांची कन्या आहे असे समजताच आजींनी हात जोडले, त्यावेळी दोघीही सद्गदित झाल्या.
      यावेळी यशस्विनीराजे यांनी एकाचवेळी शंभर चित्रकारांनी रेखाटलेली चित्रेही बारकाईने पाहिली. तसेच खाद्य महोत्सव आयोजित केलेल्या बचत गटाच्या महिलांशी विचारपूस करत त्यांच्या पदार्थांची चव चाखली.
       यावेळी प्रमोद पाटील, ऋषिकेश केसकर, उदय गायकवाड, आदित्य बेडेकर आदी उपस्थित होते.  
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!