कोल्हापूर • प्रतिनिधी
येथील यशराज पाटील व अर्जुन हरगुडे यांची सब जूनियर मुलांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.
हॉकी इंडिया यांच्यावतीने १९ ते २८ मार्च या कालावधीत हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब जूनियर मुलांच्या हॉकी स्पर्धेसाठी यशराज पाटील (महाराष्ट्र क्रीडा मंडळ) व अर्जुन हरगुडे ( छावा मित्र मंडळ ) या खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली.
यशराज हा डी. सी. नरके विद्यानिकेतन (कुडीत्रे)चा तर अर्जुन हा श्री दत्ताबाळ विद्यामंदिर (कोल्हापूर ) चे खेळाडू आहेत. या खेळाडूंना हॉकी महाराष्ट्राचे सेक्रेटरी मनोज भोरे, हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ. सुरेखा पाटील, उपाध्यक्ष विनोद नाईकवाडी, सेक्रेटरी मोहन भांडवले व इतर सर्व सदस्य तसेच हॉकी प्रशिक्षक सागर जाधव व अनिकेत मोरे या सर्वांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.