शरीरस्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी व मानसिक सुदृढतेसाठी योगा हे उत्तम साधन: डॉ. साखरे


कोल्हापूर • प्रतिनिधी
     जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व छत्रपती शिवाजी स्टेडियम योगा ग्रुप यांच्यावतीने जागतिक योगा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी प्रास्ताविक केले. योगाचे महत्व सांगताना ’युज’ या संस्कृत शब्दापासून योग हा शब्द तयार झालेला. याचा अर्थ जोडणे असा असून शरीरातील स्नायू संस्था, अस्थिसंस्था,  मज्जासंस्था इत्यादी संस्थांना एकत्रित करून शरीर स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी व मानसिक सुदृढतेसाठी योगा हे उत्तम साधन असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर योग साधनेला महत्वाचे स्थान प्राप्त झालेले असून भारतीय संस्कृतीचा वारसा संपूर्ण जगाने स्वीकारलेला असल्याची बाब त्यांनी निदर्शित केली.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधीक्षक दिलीप मोरे होते.
     केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्यावतीने दिलेल्या जागतिक योगा दिन प्रोटोकॉलच्या अनुषंगाने कार्यक्रम संपन्न झाला. शासकीय योगा प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू कु. गार्गी भट हिने योगासनांची प्रात्याक्षिके सादर केली. कोविड – १९मुळे यावर्षी जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक व खेळाडू यांनी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. 
      छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जलतरण तलावामध्ये अमर पाटील यांनी जलयोगाची प्रात्याक्षिके सादर करून एक अनोखा उपक्रम सुरू केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांनी व आभार प्रदर्शन आंतरराष्ट्रीय नेमबाज तथा तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांनी केले.
      कार्यक्रमासाठी सुधाकर जमादार, विकास माने, श्रीमती रोहिणी मोकाशी हे क्रीडा अधिकारी तसेच कुस्ती मार्गदर्शक प्रविण कोंडावळे, श्रीमती मंदाकिनी पवार, सागर जाधव,  सतीश पाटील, संदीप जाधव, गौरव खामकर आदी उपस्थित होते.
———————————————– Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *