शाहूवाडीचे योगीराज गायकवाड यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शाहुवाडी -पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील युवानेते योगीराज गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर श्री. गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांचा स्वागतपर सत्कार झाला.
    यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, योगीराज गायकवाड यांचा पक्षप्रवेश हा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे. त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.जनतेच्या प्रश्नांसाठी मध्यरात्रीसुद्धा हाकेला ओ देऊन मी या सर्वांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहीन.
   योगीराज गायकवाड म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार,  खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील व कोल्हापूर जिल्ह्याचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर  विश्वास ठेवून हा प्रवेश करीत आहोत.
     यावेळी उत्तम पाटील- सुपात्रे, विद्यानंद यादव -बांबवडे, विजय पाटील -थेरगाव, संदीप केमाडे- सैदापूर, शिवाजी गावडे- वालूर, सुभाष पाटील- पिशवी, सुभाष कांबळे – भाततळी, बाबू कांबळे- शेंबवणे, रावजी कांबळे- मांजरे, भास्कर कांबळे -घोळसावडे, अजित पिंपळे- पिंपळेवाडी, प्रमोद घाडगे, सागर आळवेकर, भाऊसाहेब घाडगे आदी प्रमुख उपस्थित होते.
 Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *