यूथ बँकेला रूपये ६.३५ कोटीचा उच्चांकी नफा

Spread the love

• बॅंकेचे तज्ञ संचालक चेतन नरके यांची माहिती
कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील यूथ डेव्हलपमेंट को-ऑफ बॅंकेला रूपये ६.३५ कोटीचा उच्चांकी नफा झाला आहे. रिझर्व बँकेने बँकेवरील निर्बंध ५ एप्रिल २०२१ पासून पूर्णपणे उठवले. त्यानंतर यशस्वीरित्या कामकाज करणारी आणि ॲसेटच्या ५.४५ टक्के नफा मिळवून नवा विक्रम प्रस्थापित करणारी यूथ बँक ही महाराष्ट्रातील पहिली बँक असल्याची माहिती बँकेचे तज्ञ संचालक चेतन नरके यांनी दिली.
     ते म्हणाले, की यूथ बँकेला रूपये ६.३५ कोटी इतका नफा झाला असून निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. सीआरएआरचे प्रमाण ११.५८ टक्के आहे. सभासदांच्या सहकार्याने बँकेचे नवीन भाग भांडवलामध्ये रुपये १.९१ कोटी इतकी विक्रमी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात नवीन सभासद १६२ झाले असून रुपये आठ लाख भागभांडवलात वाढ झाली आहे. बँकेच्या ठेवी रुपये ७४ कोटी असून गेल्या सहा महिन्यात रूपये १४ कोटीचे नवीन कर्ज वाटप केले आहे.
     बँकेची प्रगती पाहून शासकीय लेखापरीक्षकांनी गतसालच्या लेखापरीक्षण वर्गीकरणामध्ये सुधारणा करून “ब” वर्ग दिला आहे. मागील चार वर्ष ऑडिट वर्ग “क” होता, पण चालूसाली बँकेची प्रगती पाहून “ब” वर्ग मिळाला आहे. बॅंकेने आकर्षक ठेव व्याजदराच्या योजना जाहीर केल्या आहेत. शिवाय सर्वसामान्य गरजवंतांना अल्प व्याजदराने सोने तारण व वाहन तारण कर्ज योजना चालू केली असल्याचे चेतन नरके यांनी सांगितले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!