नेमबाज वर्ल्डकप स्पर्धेसाठी युवराज साळोखे तांत्रिक अधिकारी


कोल्हापूर • प्रतिनिधी
     दिल्ली येथे १८ ते २९ मार्च २०२१ या कालावधीत होणाऱ्या आयएसएसएफ वर्ल्डकप स्पर्धेसाठी कोल्हापूरचे नामवंत शूटर व नेमबाज प्रशिक्षक युवराज दादासाॊ साळोखे यांची तांत्रिक अधिकारी (जज्ज) म्हणून निवड झाली आहे.
     नामवंत नेमबाज कै. जयसिंगराव कुसाळे यांचे शिष्य असलेले युवराज उर्फ बंडा साळोखे यांनी आजपर्यंत अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून काम केलेले आहे. कॉमनवेल्थ गेम्स, एशिया ऑलम्पिक, वर्ल्डकप, सॅफ गेम्स वर्ल्डकप फायनल इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांची नेमणूक झाली होती. कजाकिस्तान आयएसएसएफ शॉटगन वर्ल्डकपसाठी संघ व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे.
     युवराज साळोखे हे रायफल शूटिंग असोसिएशन गोवाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय रायफल संघाचे जनरल बॉडी मेंबर आहेत. नेमबाजी बरोबरच मोटरसायकल रायडिंग, ऑफ रोड जिफ असोसिएशन, हिल रायडर्स अशा विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
     युवराज साळोखे यांच्या निवडीबद्दल कोल्हापूर डिस्ट्रीक्ट मेन ॲण्ड वुमेन रायफल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच रायफल शूटिंग असोसिएशन गोवाचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. किशोरशेठ मांद्रेकर, राष्ट्रीय रायफल संघाचे सचिव ॲड. विक्रम भांगले यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *