भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ममता बॅनर्जी यांचा निषेध

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      भारतीय जनता युवा मोर्चातर्फे तृणमूल कॉँग्रेस पार्टीच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचा दसरा चौक येथे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
     भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जे. पी. नड्डा हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना दक्षिण २४ परगना जिल्ह्यात त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात भाजप नेते मुकुल रॉय व कैलाश विजयवर्गीय हे जखमी झाले.  या घटनेचा निषेध भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आला.
        यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे – पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टी अध्यक्षांच्या दौऱ्यात करण्यात आलेला हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. पश्चिम बंगालला आपली स्वतःची जहांगीर समजणाऱ्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.
     यावेळी युवा मोर्चाचे सरचिटणीस विवेक वोरा, गिरीष साळोखे, सुमीत पारखे, प्रदिप घाटगे, गौरव सातपुते, सुनिल कुलकर्णी, विवेक राजवर्धन, तन्मय कुलकर्णी, शाहरूख गडवाले, नजिम आत्तार, सुनिल पाटील, सुहास शिंदे, अमित माळी, अमर चंदन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!