विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी युवा स्टेट अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     विश्वविक्रमवीर डाॅ.अथर्व संदीप गोंधळी (वय१४)  यास  बहुजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देण्यात येणारा युवा स्टेट अवॉर्ड २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    प्रसाद संकपाळ,प्रा. गिरी,  निरंजन तिवारी, महेश शिर्के अनिल माळवी, पी.आय. विजय साळूंखे, डीवायएसपी स्वाती गायकवाड साळूंखे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अथर्वची आई डॉ.सौ.मनीषा यांनाही आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
       टोप संभापुर ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या १४ व्या वर्षी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी बारा तासात २९६ किलोमीटर अंतर सायकलिंगमध्ये पूर्ण करून  कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता.
      अथर्व हा लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळवत आला आहे.सायकलिंगमध्ये त्याने केलेल्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. द डायसेस ऑफ एशिया इन इंडिया चेन्नई तामिळनाडू  यांनी घेऊन त्याला डॉक्टरेट इन एथलेटिक ही पदवी बहाल केली होती.
       डॉ.अथर्वला होली मदर स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.अनुराधा पाटील,शीतल पाटील,कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर,आकाश कोरगावकर, वडील डॉ.संदीप गोंधळी,आई डॉ.सौ.मनीषा गोंधळी,अनिल माळवी, श्रद्धा जोगळेकर यांचे सहकार्य लाभले. 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!