कोविड -१९ कर्तव्यात कसूर करणाऱ्या २० लॅबना जिल्हा परिषदेच्या नोटीसा


कोल्हापूर • ( जिमाका )
     दि.२५ एप्रिल ते १२ मे २०२१ या कालावधीत ICMR पोर्टलवरील कोविड-१९ RT PRCR चे १८७७ आणि RAT चे ३२२ कोविड रुग्णांच्या नोंदणी अहवालाच्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा व राज्यातील इतर २० लॅबनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नोटीसा बजाविल्या आहेत .
       यामध्ये RAT ( रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट ) – अंतर्गत अनुष्का डायग्नोस्टिक सेंटर (शिरोळ), केअर मल्टिस्पेशालिटी (हातकणंगले), निदान पॅथालॉजी (इचलकरंजी), जयसिंगपूरच्या अनुक्रमे पायोस हॉस्पिटल, श्री साई लॅब, कोल्हापूरचे शिवतेज लॅब, पार्थ लॅब,  देसाई पॅथालॉजी, सृष्टी क्लिनिकल लॅबोरेटरी, मृण्मयी लॅब, हेल्थ व्हयू या ११ लॅबनी तर RT – PRCR अंतर्गंत कृष्णा डायग्नोस्टिक (पुणे), डॉ. लाल पॅथालॉजी (विमाननगर – पुणे), मेट्रो पोलीस हेल्थ केअर (मुंबई), प्रिव्हेंन्टीन लाईफ केअर (नवी मुंबई), थायरो केअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. (नवी मुंबई),  इन्फेक्शन लॅबोरेटरीज (ठाणे), युडीसी सॅटेलाईट लॅबोरेटरी (नवी मुंबई), सब अर्बन डायग्नोस्टिक पुणे आणि सदाशिव पेठ (पुणे) येथील अपोलो हेल्थ लाईफ स्टाईल या ९ लॅबनी त्यांच्याकडील कोविड रूग्णांच्या चाचण्यांचा अहवाल (IDSP) एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्षास वेळेत आणि विहीत नमुन्यात सादर न केल्याने जिल्ह्याच्या कोविड निर्देशांकामध्ये तफावत आल्यामुळे या नोटीसा देण्यात आल्या आहेत .
      आपत्ती कायदयातंर्गत व साथरोग कायदयान्वये या दोषी लॅबवर पुढील कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
———————————————– 

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *